यवतमाळ जिल्ह्यात शेतकरी आत्महत्या सत्र सुरुच…

यवतमाळ:- कर्जासाठी शेतकरी पुन्हा एका शेतकऱ्याने आत्महत्या केली आहे. ही दुर्दैवी घटना घाटंजी च्या टिटवी गावातील आहे. प्रकाश माणगावकर असे या शेतकऱ्यांचे नाव आहे. गळफास घेऊन त्याने आपले प्राण त्यागले.

मृत्युपूर्वी त्याने पळसाच्या पानावर चुन्याने ‘कर्जापायी आत्महत्या’ असे शब्द लिहील्याचे घटनास्थळी पोलिसांना आढळले, असून प्रकाश यांनी कर्जफेडीसाठी त्याने काहीच दिवसापुर्वी आपल्या ५ एकर शेतीतील अडीच एकर शेती विकली होती. त्याच्या मागे त्याची पत्नी व १ मुलगा १ मुली असा परिवार आहेत . गेल्या ३ दिवसात जिल्ह्यात ३ शेतकऱ्यांनी कर्जाच्या बोझापायी मृत्यूस कवटाळले आहे या घटनेने गावात शोककळा पसरली आहे.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

one × 3 =

Social media & sharing icons powered by UltimatelySocial