आज भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात एकदिवसीय सामना…

चेन्नई: टीम इंडिया आजपासून ऑस्ट्रेलियासोबत एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळण्यास सज्ज झाली आहे.आज दुपारी १:३० वाजता चेन्नईच्या चिंदबरम स्टेडियममध्ये हा सामना खेळला जाणार आहे.

सरावादरम्यान फिरकी गोलंदाज अक्षर पटेल जखमी झाल्यामुळे, त्याच्याऐवजी संघात रविंद्र जडेजाला संधी देण्यात आली आहे . तर ओपनर शिखर धवन तीन सामने खेळणार नाही.

या दरम्यान हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, चेन्नईमध्ये शनिवारपासून सोमवारपर्यंत पाऊस पडत राहणार असल्याचा अंदाज आहे. पाऊस झाल्यास प्रेक्षकांना कमी ओव्हर्सची मॅच पहाण्यास मिळू शकते.

दुसरीकडे ऑस्ट्रेलियाचा ओपनर आरोन फिंच जखमी झाल्यानं सामन्याबाहेर आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान एकूण १२३ वनडे सामने झालेत. त्यापैकी भारत ४१ सामने तर ऑस्ट्रेलिया ७२ सामने जिंकलीय. तर १० सामन्यांचा निकाल लागू शकलेला नाही.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

seven + nineteen =

Social media & sharing icons powered by UltimatelySocial