गोंदियात महिला वकिलाचा अपहरण करून ३ महिने केला सामूहिक अत्याचार…

गोंदिया:- गोंदिया जिल्हा सत्र न्यायालयात सरकारी वकील म्हणून काम करणास इच्छुक महिलेने न्यायालयात अर्ज केल्याने स्पर्धेत असलेल्या वकिलाने महिलेची सुपारी देत अपहरण करून तिला ३ महिने जिल्हाबाहेर डांबून ठेवत तिच्यावर अत्याचार केल्याची घटना गोंदियात घडली असून महिलेने १८ सप्टेंबरला पढ काढत गोंदिया शहर पोलिसात गुन्हा दाखल केल्याने हा संपूर्ण प्रकार उघडिस आला आहे. पोलिसांनी या प्रकरणी ३ आरोपींना अटक केली आहे. तर इतर आरोपी फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहे.

गोंदिया शहराच्या बसतनगर भागात राहणाऱ्या एका महिलेने सरकारी वकील होण्यासाठी जिल्हा सत्र न्यायालयात अर्ज केला होता. तर त्याच्या स्पर्धेत वकील तोलानी यांनी अर्ज केला. तोलानी पेक्षा महिला वकील हे कामकाजात वरिष्ठ असल्याने त्यांची निवड निच्छित्त असल्याचे पाहून वकील तोलानी व पीडित वकील महिलेसोबत जुना वैमनस्य असलेले पत्रकार इंद्रकुमार राही या दोघांनी कट रचून तिच्या अपहरणाची सुपारी जुल्फिकार जब्बार गणी याला दिली.

त्याने आपला साथीदार सह पीडित महिलेला ७ जून २०१७ ला जिल्हा सत्र न्यायालयात येत, असताना न्यालयाच्या बाहेरून दिवसाढवळ्या त्यांना एका कार मध्ये बसवत वकील प्रकाश तोलानी आणि जब्बार गाणी तसेच, त्याचे इतर सहकारी मित्र यांनी तिला अज्ञात ठिकाणी नेत तिच्यावर ३ मंहिने ११ आरोपीने ७ जून ते १८ सप्टेंबर पर्यत अत्याचार केले, असून पीडितेने त्या ठिकाणहून पळ काढत गोंदिया शहर पोलिस ठाणे गाठले आहे.

आरोपी वकील प्रकाश तोलानी आणि अपहरण करणाऱ्या इतर लोकांविरुद्ध तक्रार दाखल केली पोलिसांनी यात जबार गाणी ,आशिष मिश्रा,मनीष अग्रहरी या तीन आरोपीना अटक केली असून फरार असलेल्या वकील प्रकाश तोलानी, बाकी इतर एकूण आठ आरोपींचा पोलिस शोध घेत आहे.

 

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

seven + thirteen =

Social media & sharing icons powered by UltimatelySocial