अभिनेता नाना पाटेकर आता फेरीवाल्यांच्या पाठीशी…

मुंबई : फेरीवाल्यांवरुन मुंबईत सध्या राडा सुरु आहे. फेरीवाल्यांचा मुद्दा ऐरणीवर आहे. सगळे मुंबईकर अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात आवाज उठवत आहेत. अशावेळी अभिनेता नाना पाटेकर यांनी मात्र फेरीवाल्यांच्या बाजूनं सूर आळवल्यानं, मुंबईकरांच्या भुवया उंचावल्या आहेत.

“भाकरीसाठी धडपडणाऱ्या फेरीवाल्यांच्या पोटावर पाय का देता” असा सवाल नाना पाटेकर यांनी उपस्थित केला. मुंबईतल्या प्रसिद्ध व्हीजेटीआय इन्स्टिट्यूटच्या कार्यक्रमात नाना पाटेकरांनी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती लावली. यावेळी नानानं त्यांच्या खास शैलीत विद्यार्थ्यांशी संवाद साधला.

नाना पाटेकर म्हणाले, मला वाटतं फेरीवाल्यांची यात काहीच चूक नाही. फेरीवाले आपल्या पोटाची भूक भागविण्यासाठी दोन वेळच्या भाकरीसाठी ते काम करणारच. आपण त्यांची भाकरी हिरावून घेऊ शकत नाही. यामध्ये खरंतर आपली चूक आहे, आपण महापालिकेला, प्रशासनाला इतके दिवस फेरीवाल्यांना जागा का दिली नाही? याबाबत का विचारलं नाही? म्हणजे याला आपणच जबाबदार आहोत, फेरीवाले नाही.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

one × 1 =

Social media & sharing icons powered by UltimatelySocial