२०१८ च्या टी-२० महिला क्रिकेट महायुद्धाची घोषणा

नवी दिल्ली : लवकरच क्रिकेट रसिकांना २०१८ या वर्षात महिला विश्वचषकाची पर्वणी बघायला मिळणार आहे.  या वर्षीच्या  महिला वर्ल्डकपची घोषणा झाली आहे. साधारण ९ ते २४ नोव्हेंबर दरम्यान विश्वचषक रंगणार आहे.
या विश्वचषकाचे ठिकाण हे वेस्ट इंडिज असणार आहे.  वेस्टइंडिजच्या एंटीगा, बारबुडा, गयाना आणि सेंट लूसिया मध्ये हे सामने खेळले जाणार आहेत. २०१६ मध्ये वेस्टइंडिजने ऑस्ट्रेलियाचा पराभव करत विश्वचषक  जिंकला होता. आता त्यांच्याच देशात विश्वचषक होणार असल्याने ते पुन्हा विजयाच्या स्पर्धेत असतील.

आयसीसी टी-२० टीमची कर्णधार स्टेफनी टेलरकडेच  वेस्टइंडिजचं कर्णधारपद असेल. क्रिकेट वेस्टइंडिजने या ठिकाणांची निवड बोली प्रक्रियेतून केली. यानंतर आयसीसीने याची घोषणा केली.
आयसीसीचे मुख्य कार्यकारी डेविड रिचर्डसनने म्हटलं की, ‘वेस्टइंडिजची टीम गेल्या वर्ल्डकपची चॅम्पियन आहे आणि मला यात कोणतीही शंका नाही की, ते पुन्हा चांगंली यजमान टीम ठरेल.’

वेस्टइंडिज व्यतिरिक्त वर्ल्डकपमध्ये ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, न्यूजीलंड, भारत, पाकिस्तान, दक्षिण अफ्रीका आणि श्रीलंका हे देश खेळणार आहेत. बांग्लादेश, नेदरलँड, आयरलँड, पापुआ न्यू गिनीय, स्कॉटलँड, थायलंड, युगांडा किंवा संयुक्त अरब अमीरात यामधील २ टीम क्वालिफाय होतील. ३ ते १४  जुलैदरम्यान नेदरलँडमध्ये टी-२०  क्वालीफाय सामने खेळले जाणार आहेत.

 

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

thirteen − 7 =

Social media & sharing icons powered by UltimatelySocial