‘पद्मावत’चे धुळ्यातही पडसाद ; बसची तोडफोड

धुळे : सर्वोच्च न्यायालयाने ‘पद्मावत’ हिंदुस्थानमध्ये २५ जानेवारीला प्रदर्शित करण्यास परवानगी दिल्यानंतरही राजस्थानमधील करणी सेनेचा या चित्रपटाला असणारा विरोध कमी झालेला नाही. तर ‘पद्मावत’ चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घालावी, या मागणीसाठी समस्त खान्देश राजपूत समाजातर्फे बुधवारी मुंबई-आग्रा महामार्गावरील सुरत वळण रस्त्यावर रास्तारोको करण्यात आला.
या आंदोलनाला मराठा क्रांती मोर्चा आणि मराठा समाजानेही पाठींबा देत सहभाग नोंदविला. मंगळवारी रात्री शिरपूर तालुक्यातील अमोदे गावाजवळ काही आंदोलनकर्त्यांनी शिरपूर-धुळे बसवर दगडफेक करत आग लावली. तर जुने कोडदे गावातील ग्रामस्थांनी तापी पात्रात उभे राहून जल आंदोलन केले.

पद्मावत या सिनेमाला सर्व स्तर्तून विरोध होतांना दिसतोय. म्हणजेच राजपूत समाजाचा दावा आहे, की संजय लिला भन्साळी यांनी महाराणी पद्मावतीचा इतिहास मांडतांना चित्रपटात अनेक बाबींची मोडतोड केली आहे. त्यामुळे मूळ इतिहास बाजूला राहिला आहे. यामुळे समस्त राजपूत समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. या चित्रपटाचे प्रदर्शन रोखण्यात यावे, अशी मागणी करूनही २५ जानेवारीला पद्मावत चित्रपट प्रदर्शित होईल, अशी भूमिका भन्साळी यांनी घेतली असल्याने हा विरोध तीव्र झाला आहे.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

twenty − 10 =

Social media & sharing icons powered by UltimatelySocial