महाराष्ट्रात सर्व जिल्ह्यात हेलिपॅडची सुविधा करणार

मुंबई : मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरला चार अपघात झाले. त्यानंतर जवळपास हेलिपॅड ची पूर्तता झाली नाही. त्यामुळे राज्य शासनाने हेलिपॅड बनवण्यासाठी केंद्रीय नागरी विमान महासंचालनालयाच्या नियमांवर आधारित धोरण तयार करण्यात आलं आहे.
सरकारच्या या धोरणानुसार सर्व जिल्ह्यात कायमस्वरुपी हेलिपॅड उभे करण्यात येणार आहे. त्यासाठी जागा निश्चित करून अहवाल शासनाला सादर करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांना आदेश देण्यात आले आहेत.

हेलिपॅड बांधण्यासाठी खुले मैदान, जिल्हा पोलीस परेड मैदान, एमआयडीसीतील मोकळी जागा यांना प्राधान्य देण्यात येणार आहे. हेलिपॅडची जागा सपाट, मजबूत, हलकेसे गवत असलेली असावी, त्या जागी दगड, डेब्रिज नसावे. हेलिपॅडसाठी निवडलेली जागा ५२ x ५२ मीटर पूर्णपणे मोकळी असावी. हेलिकॉप्टर उतरण्याच्या जागेवर हेलिकॉप्टरपासून २४५ मीटर आणि हेलिपॅडपासून ५०० मीटर परिघात कोणताही अडथळा नसावा. हेलिपॅडच्या परिसरात वीज वाहिन्या, डाटा-टेलिफोन केबल, ट्रान्सफॉर्मर, मोबाईल टॉवर अशा कुठलेही उड्डाणात अडथळा आणणारे घटक नसावेत. या सर्व बाबी प्रकर्षाने समजून घेतल्या पाहिजेत.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

five × three =

Social media & sharing icons powered by UltimatelySocial