गुगलच्या डूडलवर ब्रिटीश लेखिका व्हर्जिनिया वूल्फ

नवी दिल्ली : ‘चूल आणि मूल’ याच्या पलीकडे जाऊन स्त्रिया किती तरी गोष्टी करू शकतात याची जाणीव समाजाला ठळकपणे करून देण्यात ज्यांचा वाटा सर्वाधिक होता अशा ब्रिटीश लेखिका व्हर्जिनिया वूल्फ यांची आज १३६ वी जयंती. व्हर्जिनिया वुल्फचे मूळ नाव अॅडेलिन व्हर्जिनिया वुल्फ होते. त्याचा जन्म जानेवारी २५ १८८२ रोजी लंडन येथे झाला.

त्यांचे शिक्षण लंडनच्या किंग्ज कॉलेजमध्ये झाले आणि ते महिलांच्या उच्च शिक्षणाबद्दल आवाज उठवणारे पहिले लोक होते.त्यानिमित्तानं गुगलनं डुडल तयार करून साहित्यविश्वात मानाचा ठसा उमटवणाऱ्या या ब्रिटीश लेखिकेला आदरांजली वाहिली आहे. अतिशय बुद्धिमान, तितक्याच संवेदनशील आणि शब्दांवर जबरदस्त पकड असणार्या या लेखिका ब्रिटनमधल्या एका सधन कुटुंबात जन्मल्या. आयुष्यभर लेखन, वाचन हा एकच ध्यास घेऊन जन्मलेल्या व्हर्जिनिया यांना इंग्रजी साहित्याच्या दरबारात मानाचं स्थान आहे. केवळ वयाच्या नवव्या वर्षी व्हर्जिनिया यांनी आपल्या भावाच्या मदतीनं ‘२२ हाइडपार्क गेट’ नावाचं कौटुंबिक साप्ताहिक काढलं हे सांगूनही कोणाला खरं वाटणार नाही.

शब्दांवर प्रचंड हुकूमत, सातत्य, संवेदशील लिखाण आणि लेखनात प्रयोगशीलता हे त्यांच्या लिखाणाचं वैशिष्ट. ‘मिसेस डलोवे’, ‘टू द लाइटहाऊस’, ‘द वेव्हज’ यांसारख्या कांदबऱ्या आणि ‘अ रूम ऑफ वन्स ओन’ आणि ‘थ्री गिनीज’ हे त्यांचे निबंध खूपच गाजले. ब्रिटनमधल्या सधन कुटुंबात त्यांचा जन्म झाला असला तरी स्त्री म्हणून आपल्यावर बालपणी झालेल्या अन्यायाची खदखद त्यांच्या मनात होती. त्यांचे वडिल सर लेस्ली स्टीफन यांचा मुलींना औपचारिक शिक्षण देण्यास विरोध होता. त्यामुळे त्यांचं शिक्षण हे घरच्या ग्रंथालयावरच अवलंबून झालं, पण त्यांचे भाऊ मात्र केम्ब्रिजमध्ये शिकायला गेले, आणि तेव्हापासून स्त्रियांच्या शैक्षणिक हक्काबद्दल त्यांनी आग्रह धरला. सतत वाचन लेखन करून आपली वैचारिक पातळी उंचावली. वयाच्या १९ व्या वर्षी टाइम्स लिटररी सप्लिमेंटमध्ये ग्रंथसमीक्षणे लिहिण्यास त्यांनी सुरुवात केली.

 

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

nineteen + 4 =

Social media & sharing icons powered by UltimatelySocial