अंडर१९ विश्वचषक: भारताची उपांत्य फेरीत धडक…

न्यूझीलंड : पृथ्वी शॉच्या भारतीय संघानं बांगलादेशचा १३१ धावांनी धुव्वा उडवून अंडर नाईन्टिन विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत धडक मारली. आता उपांत्य फेरीत भारताचा सामना भारतानं बांगलादेशला हरवून या विश्वचषकातला सलग चौथा विजय साजरा केला.

या सामन्यात भारतानं बांगलादेशला विजयासाठी २६६ धावांचं आव्हान दिलं होतं. त्या आव्हानाचा पाठलाग करताना बांगलादेशचा डाव १३४ धावांत आटोपला.

भारताचा हा चौथा विजय आहे. भारताने पहिल्याच सामन्यात ऑस्ट्रेलियाचा १०० धावांनी पराभव केला होता. त्यानंतर पापुआ न्यू गिनी आणि झिम्बाब्वेवर १०-१० विकेट्स राखून विजय मिळवला.

आता उपांत्य फेरीत भारताला पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी दोन हात करावे लागणार आहेत. ३० जानेवारी रोजी ख्राइसचर्च येथे उपांत्य फेरीचा सामना रंगणार आहे.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

19 − 9 =

Social media & sharing icons powered by UltimatelySocial