“शिवराज्याभिषेक” सोहळ्याचा चित्ररथ राजपथावर…

दिल्ली : प्रजासत्ताक दिनाच्या परेडसाठी राजपथावर छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्यभिषेक सोहळा पाहायला मिळाला. चित्ररथाच्या माध्यमातून शिवाजी महाराजांचा राज्यभिषेक सोहळा देशाने अनुभवला.

‘तेज तम अंस पर । कान्ह जिमि कंस पर । त्यों मलिच्छ बंस पर । सेर सिवराज है । या कविराज भूषण यांच्या वीररसाने भरलेल्या काव्याचा उद्घोष करत शिवरायांची किर्ती सांगणारा चित्ररथ राजपथावर उतरला होता. शिवाजी महाराजांचा चित्ररथ राजपथावर आल्यानंतर शिवसृष्टी पाहून खासदार संभाजीराजेंची उभं राहून ‘जय भवानी, जय शिवाजी’च्या घोषणा दिल्या. महाराष्ट्राच्या चित्ररथातील कवी भूषण यांचं हे काव्य अजय-अतुलने संगीतबद्ध केलेलं आहे.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

eighteen − five =

Social media & sharing icons powered by UltimatelySocial