जम्मू-काश्मीर मध्ये सीआरपीएफ तळावर हल्ला ; एक जवान शहीद

जम्मू-काश्मीर : पुन्हा एकदा देशाच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. कारण श्रीनगरच्या करण नगरमध्ये तब्बल ३० तासांनंतरही दहशतवाद्यांसोबतची चकमक अद्याप सुरुच आहे. या चकमकीत लष्कराचा एक जवानही शहीद झाला आहे.

सीआरपीएफ तळावर हल्ला करण्याच्या उद्देशाने आलेले दहशतवादी जवळच एका इमारतीतून सैनिकांवर सतत गोळीबार करत आहेत. या चकमकीत बिहारमच्या आरामधील सीआरपीएफ कॉन्सटेबल मोजाहिद खान हे शहीद झाले. गेल्या ४४ दिवसांमध्ये आतापर्यंत लष्कराचे २५ जवान शहीद झाले आहेत.

काल (सोमवार) पहाटे ४.३० वाजता सीआरपीएफच्या गेटजवळ दोन दहशतवादी घुसखोरी केली. पण चोख बंदोबस्तामुळे त्यांना कॅम्पमध्ये घुसता आलं नाही आणि त्यांनी जवळच्या एका इमारतीच्या साहायाने गोळीबार सुरु केला. परिसरातील सर्व नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे.

 

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

17 − 10 =

Social media & sharing icons powered by UltimatelySocial