धर्मा पाटील यांच्या कुटुंबियांना ५४ लाख रुपये मोबदला देण्याची शिफारस

मुंबई : जानेवारीत विष प्राशन केलेल्या शेतकरी धर्मा पाटील यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबीयांना ५४ लाख रुपयांचा मोबदला मिळणार आहे. धर्मा पाटील यांच्या जमिनीच्या फेरमूल्यांकनाचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांनी ऊर्जा विभागाला सादर केला आहे.

धुळे जिल्ह्यात होणाऱ्या औष्णिक वीज प्रकल्पात त्यांची पाच एकर जमीन संपादित करण्यात आली होती. या पाच एकर जमिनीसाठी ५४ लाख रुपये मोबदला देण्याची शिफारस अहवालात करण्यात आली आहे. यापूर्वीचा पंचनामा रद्द करुन रोपांच्या संख्येनुसार सानुग्रह अनुदान ग्राह्य धरण्यात येणार आहे.

मनरेगा कायद्यातील तरतुदीप्रमाणे धर्मा पाटील यांच्या नावे २८ लाख ५ हजार ९८४ रुपये तर त्यांचे पुत्र नरेंद्र पाटील यांना २६ लाख ४२ हजार १४८ रुपयांचा मोबदला मान्य करण्यात आला आहे. इतर १२ प्रकल्पबाधित शेतकऱ्यांनाही वाढीव मोबदला मिळणार आहे.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

nineteen − ten =

Social media & sharing icons powered by UltimatelySocial