कोचीन शिपयार्डमध्ये अचानक स्फोट ; ५ जण ठार

कोची : आज सकाळच्या सुमारास कोचीन शिपयार्डमध्ये अचानक स्फोट होऊन पाच जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच या घटनेत १५ जण जखमी झाल्याचे वृत्त आहे.

‘सागर भूषण’ या ओएनजीसीच्या जहाजावर स्फोटामुळे अचानक आग लागली. यावेळी जहाजावर दुरुस्तीचे काम करणारे काही कामगार आगीच्या भक्ष्यस्थानी सापडले. दरम्यान, घटनेतील मृतांची ओळख पटली असून जखमींना तत्काळ उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलीस आणि अग्निशामक दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले आहे. सध्या आग पूर्णपणे आटोक्यात असल्याचे वृत्त आहे.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

four + 10 =

Social media & sharing icons powered by UltimatelySocial