‘सुई धागा’ चा पहिला लुक प्रदर्शित

मुंबई :‘परी’ च्या भयानक लूक नंतर बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि अभिनेता वरुण धवनचा आगामी चित्रपट ‘सुई धागा’चा फर्स्ट लुक प्रदर्शित झाला आहे. ‘सुई धागा’ या चित्रपटात वरुण आणि अनुष्का सर्व सामान्य नागरिकाच्या भूमिकेत दिसणार आहे.

निख्खळ मराठीत शीर्षक असणाऱ्या या चित्रपटाचे पोस्टर नुकतेच प्रदर्शित करण्यात आले. ‘सुई धागा’चा फर्स्ट लूक अनुष्का आणि वरुण धवन आपल्या सोशल मीडिया अकांऊटवर शेअर केला आहे. चित्रपटाचा फर्स्ट लूक पोस्टर शेअर करत वरुणने लिहिले की, ‘मौजी और ममता से मिलिए २८ सितम्बर को.’
म्हणजेच या चित्रपटही हि प्रमुख नाव असण्याची शक्यता आहे. अनुष्का ही ‘ममता’ या सामान्य स्त्रीच्या वेशात दिसते. साडी, हातात बांगड्या, भांगात कुंकू अशा या लूकमध्ये ही अभिनेत्री नुकतेच लग्न झालेल्या मुलीप्रमाणे दिसते.

 

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

seventeen + 17 =

Social media & sharing icons powered by UltimatelySocial