तुमच्या केसांचे सौंदर्य वाढवायचं ‘हे’ करा ?

एकीकडे वातावरण बदलामुळे आरोग्यावर परिणाम होत असताना बदलत्या ऋतूसोबत केसांच्या समस्या वाढायला लागल्या आहेत. अशा वेळी केसांसाठी अनेक उपाय केले जातात. नुकत्याच झालेल्या एका संशोधनात असे समोर आले आहे की बटाट्याचा रस केसांच्या आरोग्यासाठी उपयोगी आहे.
कच्च्या बटाट्याने केस धुतल्याने केस मजबूत होतात. बटाट्यात भरपूर स्टार्च असल्याने केसातील अतिरिक्त तेल निघून जाते. अत्यंत स्वस्त व सहज उपलब्ध असणाऱ्या बटाट्याचे इतरही फायदे आहेत.

बटाट्याचा रस केसांची लांबा वाढवण्यास मदत करतो. महिन्यातून दोनदा बटाट्याचा रस डोक्याला लावावा.
केसांचा जुना रंग काढून नवीन रंग लावण्यापूर्वी केसांना बटाट्याचा रस लावा. केस खूप गळत असतील तर खोबरेल तेलात मिसळून बटाट्याचा रस लावा.
डोक्याची त्वचा तेलकट असल्यास बटाटा लावणे लाभदायक आहे.

 

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

1 + sixteen =

Social media & sharing icons powered by UltimatelySocial