तीन देशांच्या टी-२० मालिकेची धुरा रोहित शर्माकडे

मुंबई : श्रीलंकेत ६ मार्चपासून सुरू होत असलेल्या तीन देशांच्या टी-२० मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली. या मालिकेत भारतीय संघाची धुरा रोहित शर्माकडे सोपवण्यात आली आहे. तर शिखर धवनला उपकर्णधारपदावर बढती देण्यात आली. विराट कोहली आणि महेंद्रसिंह धोनीला विश्रांती देण्यात आली आहे.

भारत, श्रीलंका आणि बांगलादेशदरम्यान होणाऱ्या निदाहास टी-२० ट्रॉफीतील पहिला सामना ६ मार्च रोजी होईल. भारत-श्रीलंका सामन्याने मालिकेची सुरूवात होईल. श्रीलंकेच्या स्वातंत्र्याला ७० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त निदाहास ट्रॉफीचे आयोजन करण्यात आले आहे. या मालिकेतील सर्व सामने हे कोलंबोतील प्रेमदासा स्टेडिअमवर होणार आहेत.

या मालिकेतील पहिला सामना भारत आणि श्रीलंका याच्यादरम्यान होणार आहे. या मालिकेसाठी निवडकर्त्यांनी कोहली आणि धोनीशिवाय भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह, हार्दिक पांड्या आणि कुलदीप यादव यांनाही विश्रांती देण्याचा निर्णय घेतला आहे. आफ्रिकेविरूद्धच्या टी-२० मालिकेत चांगली कामगिरी करणाऱ्या सुरेश रैनाला निवडकर्त्यांनी या मालिकेत संधी दिली आहे.

असा असेल भारतीय संघ
रोहित शर्मा (कप्तान), शिखर धवन (उपकप्तान), केएल राहुल, सुरेश रैना, मनीष पांडे, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), दीपक हुडा, वॉशिंगटन सुंदर, युजवेंद्र चहल, अक्षर पटेल, विजय शंकर, शार्दुल ठाकूर, जयदेव उनादकत, मोहम्मद सिराज, ऋषभ पंत (यष्टीरक्षक)

 

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

one × two =

Social media & sharing icons powered by UltimatelySocial