दक्षिण आफ्रिकेचा ‘हा’ खेळाडू करणार क्रिकेटला अलविदा

नवी दिल्ली : विश्वचषकात सामना हरल्यामुळे मैदानावर अक्षरशा रडला होता त्या खेळाडूने निवृतीची घोषणा केली आहे. दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज मोर्न मॉर्कलने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा करणार आहे.

मोर्ने मोर्केल ची शेवटचा सामना हा ऑस्ट्रेलियाविरूद्ध असणार आहे. ४ मॅचची टेस्ट सिरीज त्याच्या करियरची शेवटची सिरीज असेल. सध्याचे आंतरराष्ट्रीय शेड्यूल्ड खूप व्यस्त आहे. अशात परिवाराला वेळ देण्यासाठी मी हा निर्णय घेतलाय. असे त्याने सांगितले.

”मला आताही वाटतय की माझ्या आत खूप क्रिकेट बाकी आहे. पुढे काय होईल याबद्दल मी उत्सूक आहे. सध्या माझं पूर्ण लक्ष आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या आगामी सिरीजकडे असल्याचे’ही त्याने सांगितले.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

2 + eighteen =

Social media & sharing icons powered by UltimatelySocial