कुसुमाग्रजांना जयंतीदिनीच महापौरांनी वाहिली श्रध्दांजली

नाशिक : एकीकडे राज्यात मराठी भाषा दिनाचे औचित्य साधून अनेक कार्यक्रम आयोजित केले आहेत. या दिवशी कवीश्रेष्ठ कुसुमाग्रज तथा वि. वा. शिरवाडकर यांचा जन्मदिवस आणि म्हणून हा दिवस मराठी भाषा दिवस म्हणून ओळखला जातो. तसेच त्यांचा वाढदिवस जागतिक मराठी भाषा दिन म्हणुन पाळला जातो. परंतु नाशिक येथे त्यांच्या जयंतीदिनीच महापौरांनी आज त्यांना श्रध्दांजली वाहिली.

ही चूक त्यांच्या लक्षात आणुन दिल्यावरही त्या निग्रहाने पुढे बोलत राहिल्या. कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांच्या गावीच सकाळी आठला होणारा कार्यक्रम अकराला झाला. त्यानंतर शहराच्या प्रथम नागरीकांनी त्यांना श्रध्दांजली वाहिल्याने आजचा कार्यक्रम काहीसा वेदनादायीच ठरला.
सोदाहरण कुसुमाग्रजांचा जयंतीदिनी त्यांच्या निवासस्थानी दरवर्षी कुुसमाग्रज प्रतिष्ठान कडुन सकाळी आठला कार्यक्रम होतो. मात्र, महापौरांना अन्य कार्यक्रम असल्याने त्यांनी सकाळी आठ ऐवजी अकराला उपस्थित राहू अशी पूर्वसुचना दिली होती. अकराला कार्यक्रम झाला मात्र अपवाद वगळता महत्वाचे पदाधिकारीच नव्हते. महापौरांनी यावेळी ”जयंती दिनानिमित्त मी श्रध्दांजली अर्पण करते. हा कार्यक्रम दरवर्षी साजरो होतो. त्याचा आम्हाला अभिमान वाटतो.” असे प्रतिपादन केले.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

twenty + twelve =

Social media & sharing icons powered by UltimatelySocial