कॉंग्रेस नेते पी. चिदंबरम यांच्या मुलाला अटक

दिल्ली : माजी केंद्रीय अर्थमंत्री जेष्ठ कॉंग्रेस नेते पी. चिदंबरम यांना सीबीआयने मोठा झटका दिला आहे. मनी लॉण्ड्रिंग प्रकरणी सीबीआयने चिदंबरम यांचे चिरंजीव कार्ती चिदंबरम यांना आज अटक केली असून दुपारी त्यांना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

आयएनएक्स मीडियामध्ये २००७ साली ३०० कोटींची परकीय गुंतवणूक आणण्यासाठी परवानगी घेताना गैरप्रकार झाल्याचा कार्ती यांच्यावर आरोप आहे. त्यावेळी पी. चिदंबरम हे केंद्रीय अर्थमंत्री होते. मुलाच्या कंपनीला फायदा मिळावा म्हणून अधिकाराचा गैरवापर करून त्यांनी ही मंजुरी दिल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

two + 13 =

Social media & sharing icons powered by UltimatelySocial