नीट परीक्षेसाठी महाराष्ट्रात सहा नवी केंद्रे

नवी दिल्ली : यावर्षी नीट परीक्षेसाठी एकूण ४३ नव्या केंद्रांना मान्यता देण्यात आली आहे. यंदा नीट परीक्षा एकूण दीडशे शहरांमध्ये पार पडणार. यामध्ये महाराष्ट्रातील सहा नव्या केंद्रांचा समावेश आहे.

यापूर्वी भारतातील एकूण १०७ केंद्रावर नीटची परीक्षा घेतली जात असे. यावेळी महाराष्ट्रातील सहा केंद्रांसह ४३ केंद्रांचा नव्याने समावेश करण्यात आला आहे. यामध्ये मुंबई उपनगर, बीड, बुलडाणा, जळगाव, लातूर आणि सोलापूरचा समावेश आहे.

याचदरम्यान मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी नीट २०१८ परीक्षा रविवारी ६ मे रोजी सकाळी १० वाजता होणार असल्याची माहिती ट्विटरवरुन माहिती दिली.
नीटसाठी राज्यात आतापर्यंत मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर, नाशिक, औरंगाबाद, अहमदनगर, अमरावती, सातारा आणि कोल्हापूर ही दहा केंद्रं होती. त्यामुळे महाराष्ट्रातील एकूण केंद्रांची संख्या १६ वर पोहचली आहे.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

8 + 17 =

Social media & sharing icons powered by UltimatelySocial