स्वतःला गोळी झाडत तरुणाची आत्महत्या

अहमदनगर : नेवासा येथील २२ वर्षीय तरुणाने राहत्या घरी गावठी कट्ट्यातून गोळी घालून आत्महत्या केल्याची घटना सोमवारी घडली. संकेत पांडुरंग घोरतळे असे आत्महत्या केलेल्या तरुणाच नाव आहे.

कुटुंबियांना हि घटना लक्षात आल्यानंतर तत्काळ त्याला ताबडतोब नगरच्या सिव्हिल हॉस्पीटलला उपचारासाठी नेण्यात आले. परंतु उपचार सुरु असताना संकेतनं अखेरचा श्वास घेतला.
नेवासा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रवीणचंद लोखंडे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी, मृतदेहाचे शवविच्छेदन औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात करण्यात येणार असल्याची माहिती दिली.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

six − two =

Social media & sharing icons powered by UltimatelySocial