पुणे महापालिकेचा भरीवपूर्ण कामांचा अर्थसंकल्प सादर

पुणे : राज्यातील महत्वाची महापालिका असलेल्या पुणे महापालिकेचा अर्थसंकल्प मंगळवारी सादर करण्यात आला. यावर्षीचा २०१८-१९ साठी ५ हजार ८७० कोटी रुपयांचा अर्थसंकल्प आहे. मागच्या वर्षीच्या अर्थसंकल्पापेक्षा ४२ कोटी रुपयांनी हा अर्थसंकल्प कमी आहे.

या अर्थसंकल्पामध्ये महापालिकेच्या सर्व शाळांमध्ये मोफत सॅनिटरी नॅपकिन देण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला असून सद्य स्थितीला २३ शाळांमध्ये सॅनिटरी नॅपकिन व्हेंडिंग मशीन बसवण्यात येणार असल्याचे त्यांनी सभागृहाला सांगितले. तसेच समान पाणीपुरवठा योजनेसाठी ३२० कोटी रुपये, शिवसृष्टीसाठी २५ कोटी रुपये, तर कचऱ्यासाठी ४७८ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलीय.
यात, रामटेकडीमधील ७५० टन कचऱ्यावर प्रक्रीया प्रकल्पाला आर्थिक तरतूद, नव्यानं समाविष्ट ११ गावांत अत्याधुनिक कचरा प्रक्रीया प्रकल्प उभारण्यात येतील.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

four − three =

Social media & sharing icons powered by UltimatelySocial