बळीराजाला देखील आरक्षणाची गरज : शरद पवार

मुंबई : भारत हा कृषिप्रधान देश आहे, त्यामुळे आता बळीराजाला देखील आरक्षण मिळण्याची गरज आहे , असे विधान रा. कॉ. अध्यक्ष शरद पवार यांनी केले आहे. रॅपिड फायर मुलाखतीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी यांनी म्हटलं होते कि, आर्थिक निकषांनुसार आरक्षण द्यावं. मात्र, या मुलाखतीनंतर त्यांच्यावर अनेक स्तरातून टीका सुरु झाली. आता शेतकऱ्यांना आरक्षण देण्याची मागणी त्यांनी केली आहे.

सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास शेतकऱ्यांना आरक्षण देण्यात यावं असं त्यांनी म्हटलं आहे. ‘दिवसेंदिवस शेती कमी होत आहे. ८२ टक्के लोकांकडे २ एकरपेक्षा कमी शेती आहे तर ७० ते ७२ टक्के शेतजमीनीला पाणी नाही. त्यामुळे आर्थिक निकषासोबत शेतकी व्यवसाय करणाऱ्या वर्गाला शेतकरी म्हणून आरक्षण द्यायला हवे.’ असं वक्तव्य त्यांनी केलं आहे.

‘शेतकऱ्यांमध्ये सर्वच समाज येतात. त्यात आदिवासींपासून, ओबीसी, मराठा अशांचा समावेश आहे. मात्र, आरक्षणाचे निकष ठरवताना सामाजिक, शैक्षणिक व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना समोर ठेवायला हवे, असं माझं मत आहे.’ असंही पवार यावेळी म्हणाले.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

nine − 7 =

Social media & sharing icons powered by UltimatelySocial