प्रिया वारियरची श्रीदेवींना गाण्यातून श्रद्धांजली

मुंबई : अभिनेत्री श्रीदेवी यांना विविध स्तरातून श्रद्धांजली व्यक्त करण्यात येत आहे. अशातच नॅशनल क्रश प्रिया वारियरने श्रीदेवीना गाण्यातून श्रद्धांजली व्यक्त केली आहे. कभी अलविदा ना कहना हे गाणं म्हणतानाचा व्हिडीओ तिने सोशल मीडियावर शेअर केला आहे. आपल्या ऑल टाईम फेव्हरेट अभिनेत्रीच्या निधनाने दुःख झाल्याचंही तिने म्हटलं आहे.

श्रीदेवी यांचा तीन दिवसांपूर्वी दुबईत मृत्यू झाला. मृत्यूची चौकशी पूर्ण झाल्यानंतर मृतदेह कपूर कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला आणि पार्थिव रात्री ९.४० वाजताच्या सुमारास मुंबई विमानतळावर दाखल झालं. यावेळी कपूर कुटुंबीय त्यांच्यासमवेत होतं. टीना आणि अनिल अंबानी, अनिल कपूर, सोनम कपूर विमानतळावर उपस्थित होते.

पहा व्हिडिओ :

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

1 × 1 =

Social media & sharing icons powered by UltimatelySocial