श्रीदेवी यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात

मुंबई : अभिनेत्री श्रीदेवी यांचे पार्थिव मुंबईतील ग्रीन एकर्स या त्यांच्या निवासस्थानी जवळपास ७३ तासांनंतर मंगळवारी रात्री दाखल झाले. रात्री ९.३० च्या सुमारास दुबईतून चार्टर्ड विमानाने हे पार्थिव मुंबई विमानतळावर आणण्यात आले. श्रीदेवी यांच्या पार्थिवाच्या अंत्ययात्रेस सुरवात झाली आहे.

पार्थिव निवासस्थानी पोहोचल्यानंतर श्रीदेवी यांचे पती बोनी कपूर यांची भेट घेण्यासाठी सेलिब्रेटींनी ग्रीन एकर्सची वाट धरल्याचे पाहायला मिळाले. बुधवारी सकाळी सेलिब्रेशन स्पोर्ट्स क्लब या ठिकाणी श्रीदेवी यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवले होते त्यानंतर चाहते आणि कलाकार मंडळींनी तेथे गर्दी करण्यास सुरुवात केली होती. चित्रपटसृष्टीतील बऱ्याच कलाकारांचे पाय ग्रीन एकर्सकडे वळले होते.
काही वेळात श्रीदेवी यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येतील.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

two × 3 =

Social media & sharing icons powered by UltimatelySocial