सुवर्ण महोत्सवी वर्षी कुर्ल्याच्या पंतवालावलकर शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा.

मुंबई : द ग्रेट बॉम्बे टीचर असोसिएशन राज्यस्तरीय आयोजित डॉ.होमी भाभा बालवैज्ञानिक सायन्स टेलेंट कॉम्पिटिशन स्पर्धा घेण्यात आली होती .यंदा या परीक्षेत कुर्ला येथील पंतवालावलकर माध्यमिक विद्यालयातील सहावी इयत्तेत शिकणाऱ्या ईशान पैलवान या विद्यार्थ्यांने गोल्ड मेडेल मिळवत शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.

यशवंतराव चव्हाण नाट्यमंदिर माटुंगा येथे जेष्ठ शास्त्रज्ञ पदमविभूषण डॉ.अनिल काकोडकर यांच्या शुभहस्ते गोल्ड मेडल व रोख तीन हजार रुपये देऊन ईशानचा गौरव करण्यात आला.

या विद्यार्थ्यांला शाळेतील शिक्षकांनी अनमोल मार्गदर्शन केले.आपल्या प्रचंड बुद्धीमतेच्या व चिकाटीच्या जोरावर अवघ्या वयाच्या अकराव्या वर्षी ईशान ने हे यश मिळवलं आहे. त्यामुळे त्याच्यावर  सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.यंदा पंतवालावलकर शाळेला ५० वर्ष पूर्ण होत आहेत आणि आपल्या विद्यार्थ्यांनी अशाप्रकारचे यश मिळवल्याने शाळेचे मुख्याध्यापक, पर्यवेक्षक, शिक्षक ,पालक यांच्यात आनंदाचे वातावरण आहे. या कौतुक सोहळ्या नंतर शाळेचे सचिव, मुख्याध्यापक, शिक्षक यांनी ईशान चे स्वागत करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

 

 

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

one × five =

Social media & sharing icons powered by UltimatelySocial