निदाहस करंडक; भारताचा लंकेवर विजय

कोलंबो : रोहित शर्माने नाणेफेक जिंकून श्रीलंकेला प्रथम फलंदाजीस आमंत्रित केले. लढतीपूर्वी पाऊस झाल्याने लढत उशिरा सुरू झाली. त्यामुळे एक षटक कमी करून ही लढत प्रत्येकी १९ षटकांची खेळविण्यात आली.

मनीष पांडे आणि दिनेश कार्तिकने पाचव्या विकेटसाठी केलेल्या ६८ धावांच्या भागीदारीच्या जोरावर भारताने निदाहस करंडक टी-२० तिरंगी क्रिकेट मालिकेत श्रीलंकेवर ६ विकेटनी मात केली. श्रीलंकेने दिलेल्या १५३ धावांचे लक्ष्य भारताने चार विकेटच्या मोबदल्यात १७.३ षटकांत पूर्ण केले.

शार्दुल ठाकूर, विजय शंकर आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी श्रीलंकेच्या फलंदाजांवर अंकुश लावत त्यांना मोठी धावसंख्या उभारु दिली नाही. पहिल्या डावात शार्दुल ठाकूर हा भारतीय गोलंदाजीचा हिरो ठरला. शार्दुलने श्रीलंकेच्या ४ फलंदाजांना माघारी धाडलं. या विजयासह भारतीय संघ चार गुणांसह गुणतक्त्यात आघाडीवर पोहोचला.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

10 − 3 =

Social media & sharing icons powered by UltimatelySocial