बॉलिवूड स्टार अमिताभ बच्चन यांची प्रकृती अचानक बिघडली…

जोधपूर : राजस्थानच्या जोधपूर येथे चित्रीकरण करत असताना बॉलिवूड स्टार अमिताभ बच्चन यांची प्रकृती अचानक बिघडली असून त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहेत. अमिताभ यांच्यावर उपचार करण्यासाठी मुंबईतून डॉक्टराची एक टीमही जोधपूरकडे रवाना झाली आहे.

‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’च्या चित्रीकरणासाठी अमिताभ बच्चन जोधपूरला आले होते. प्रचंड उन्हात सलग चित्रीकरण केल्यामुळे त्यांची प्रकृती बिघडल्याचं सांगण्यात आलं. दरम्यान, अमिताभ यांना मुंबईत हलविण्यात येणार असून त्यासाठी विशेष चार्टेड विमान मागविण्यात आल्याचं समजतं.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

16 + 10 =

Social media & sharing icons powered by UltimatelySocial