नक्षलवादी हल्ल्यात ८ जवान शहीद…

सुकमा : छत्तीसगडमधील सुकमा जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी घडवलेल्या आयईडी स्फोटात ८ जवान शहीद झाले. या स्फोटात सहा जवान जखमी झाले असून यातील चार जणांची प्रकृती गंभीर आहे.

सुकमा जिल्ह्यातील किस्तराम परिसरातून केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या २१२ व्या बटालयनचे जवान जात होते. यादरम्यान नक्षलवाद्यांनी आयईडीद्वारे स्फोट घडवला. या स्फोटात आठ जवान घटनास्थळीच शहीद झाले. तर सहा जवान गंभीर जखमी झाले. या घटनेची माहिती मिळताच सुरक्षा दलांचे पथक घटनास्थळी रवाना झाले आहे.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

fourteen − 2 =

Social media & sharing icons powered by UltimatelySocial