धक्कादायक घटना: हॉस्पिटल मध्ये अवतरला मांत्रिक

पुणे : महिलेवर उपचार करण्यासाठी चक्क हॉस्पिटल मध्ये मंत्रतंत्राचा वापर झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दुर्दैवाने या घटनेत विवाहितेला प्राण गमवावे लागले. पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात हा प्रकार घडला आहे.

पुण्यातील स्वारगेट परिसरातील डॉ. सतीश चव्हाण यांच्याकडे संध्या सोनवणे ही २४ वर्षीय महिला उपचारासाठी आली होती. तिच्या छातीत दुधाची गाठ झाल्याचा अहवाल आला. मात्र ऑपरेशन केल्यानंतर तिची प्रकृती खालावली.

या दरम्यान महिलेच्या कुटुंबीयांनी एका मांत्रिकाला थेट रुग्णालयात बोलावून जादूटोणा केला. या मांत्रिकाने डॉक्टर आणि नर्सच्या समोरच मंत्र पुटपुटत महिलेच्या अंगावरून उतारा काढला. दरम्यान, आजार अधिकच बळावल्याने या महिलेचा मृत्यु झाला.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

5 × 2 =

Social media & sharing icons powered by UltimatelySocial