कोरेगाव-भीमा हिंसाचार प्रकरणी गुन्हे मागे घेणार: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : १ जानेवारी रोजी कोरेगाव-भीमा हिंसाचार प्रकरणात दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिली. परंतु, गंभीर गुन्हे मागे घेण्यासंदर्भात समिती निर्णय घेईल असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

मिलिंद एकबोटेवर तात्काळ गुन्हा दाखल केला असून फरार झालेल्या एकबोटेंना शोधण्यासाठी कोंबिंग ऑपरेशन केल्याची माहिती त्यांनी दिली. तसेच कोठडी मागितली व चौकशीची मागणी केल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

या हिंसाचाराचा फटका पोलिसांनाही बसला होता. यात ६० पोलीस आणि ५८ नागरिक जखमी झाले आहेत. कोरेगाव-भीमा हिंसाचाराचे राज्यभरात पडसाद उमटले होते. या घटनेनंतर १७ अॅट्रोसिटी आणि ६५० हून अधिक गुन्हे दाखल झाले. या गुन्ह्यांप्रकरणी जवळपास २ हजार आरोपींना अटक करण्यात आली असून हजारो व्यक्तींवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

9 − seven =

Social media & sharing icons powered by UltimatelySocial