निदाहास करंडक टी-२०: आज रंगणार भारत विरुद्ध बांगलादेश सामना

कोलम्बो : भारतीय संघ आज रंगणारी निदाहास करंडक तिरंगी टी-२० स्पर्धेतील बांगलादेशविरुद्धची झुंज जिंकण्यासाठी जीवाचे रान करेल. ही झुंज जिंक्यावर भारताचा अंतिम फेरीतील प्रवेश निश्चित होईल.

श्रीलंकेसोबतच्या सामन्यात भारताला संघर्ष करावा लागला होता पण मनीष पांडे आणि शार्दूल ठाकूर यांच्या कामगिरीमुळे भारताने यजमान श्रीलंकेवर विजय मिळवला. याच स्पर्धेच्या सलामीला भारतीय संघाला श्रीलंकेकडून अनपेक्षित पराभव पत्करावा लागला होता. त्यातून वेळीच सावरत टीम इंडियाने यशस्वी पुनरागमन केले.

श्रीलंकेविरुद्ध विक्रमी २१५ धावांच्या लक्ष्याचा यशस्वी पाठलाग केल्यामुळे बांगलादेशचे मनोधैर्य उंचावलेले आहे. आता भारताचा पराभव करीत अंतिम फेरीतील प्रवेशाची दावेदारी अधिक मजबूत करण्यास श्रीलंका संघ उत्सुक आहे. भारताला या लढतीत पराभव स्वीकारावा लागला तरी अंतिम फेरी गाठण्याची संधी राहील, पण त्यासाठी बांगलादेश व श्रीलंका यांच्यादरम्यान खेळल्या जाणाऱ्या लढतीच्या निकालावर अवलंबून राहावे लागेल. अशा स्थितीत नेटरनरेटला महत्त्व अधिक असेल.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

twenty − 8 =

Social media & sharing icons powered by UltimatelySocial