बलत्कार प्रकरणी “आसाराम” अखेर दोषी ठरला…

जोधपूर :  वादग्रस्त अध्यात्मिक गुरू आसाराम बापू याला जोधपूर सत्र न्यायालयाने दोषी ठरविल्यानंतर न्यायालयाने त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. तर शिल्पी व शरद यांना प्रत्येकी २० वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. या प्रकरणात दोघांना निर्दोष सुनावण्यात आले आहे. न्यायाधीश मधुसुदन शर्मा यांनी या खटल्याचा निकाल सुनावला.


निकाल सुनावल्यानंतर आसारामबापूच्या प्रवक्त्या नीलम दुबे यांनी, आम्ही आमच्या वकिलांशी चर्चा करणार आहोत. त्यानंतरच पुढील पावले उचलली जातील.

आसाराम अखेर दोषी ठरला आहे. आम्हाला न्याय मिळाला. या लढ्यामध्ये आम्हाला पाठिंबा देणार्‍या सर्वांचे आभार या प्रकरणातील साक्षीदारांचीही हत्या झाली; त्यांनाही न्याय मिळाला. आता आसाराम बापूला कठोर शिक्षा होईल, अशी आशा आहे. अशी भावना अत्याचारग्रस्त मुलीचे वडिलांनी व्यक्त केली.

२०१३ मध्ये जोधपूर जवळील आसारामच्या आश्रमात एका उत्तर प्रदेशातील १६ वर्षीय मुलीवर बलात्कार व अत्याचाराच्या आरोपाखाली त्याला अटक करण्यात आली होती. राजस्थान उच्च न्यायालयाच्या आदेशांनुसार, जोधपूर विशेष न्यायालय मध्यवर्ती कारागृहाच्या भागातच हा निकाल जाहीर केला गेला.

 

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

seven − 5 =

Social media & sharing icons powered by UltimatelySocial