डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ऐवजी छापला विलासराव देशमुख यांचा फोटो

मुंबई : राज्य सरकारच्या माहिती आणि जनसंपर्क संचालनालयाने ‘महाराष्ट्र अहेड’ या इंग्रजी विशेषांकात विद्यार्थी दशेतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणून दिवंगत माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचा फोटो छापला आहे. महाराष्ट्र सरकारच्या या भोंगळ कारभारावर सर्वत्र टीका होत आहे.

काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण याबाबत म्हणाले, की भाजप सरकारला बाबासाहेबांबद्दल श्रद्धा नाही. सरकारी खर्चात मुख्यमंत्री माहिती संचालनालयाच्या माध्यमाने स्वतःची प्रतिमा उजळ करत आहेत. त्यांना सरकारच्या प्रतिमेचे काही देणेघेणे नाही. संघाचा अजेंडा माहिती संचालनालय राबवत आहे.

या विभागाचे प्रमुख म्हणून मुख्यमंत्र्यांनी झालेल्या प्रकाराची जबाबदारी घ्यावी, अशी टीका माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे. सरकारची ही अक्षम्य चूक आहे. या गंभीर प्रकाराची चौकशी करून संबंधितांवर जबाबदारी निश्चित केली पाहिजे, अशी मागणीही पृथ्वीराज चव्हाण यांनी केली.

 

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

13 + 4 =

Social media & sharing icons powered by UltimatelySocial