शाळकरी विद्यार्थी सनी साळवे याच्या खुन प्रकरणात विशेष सरकारी वकील म्हणून अॅड. उज्वल निकम यांची नियुक्ती करा_ RPI खरात पक्ष

धुळे : शाळकरी विद्यार्थी प्रशांत उर्फ़ सनी साळवे या १५ वर्षीय बालकाची निर्घृण पने हत्या करण्यात आली, आरोपी हातात नागद्य तलवारी व लोखंडी पाइप घेऊन सम्पूर्ण शहरात एक ते दीड तास दहशत माजवत फिरत असतांना शहरातील नागरिकांनी पाहिले आहे.

 

पोलिसांची दहशतच संपली आहे सट्टा,जुगार,भांग,गांजा अश्या व्हाइट कॉलर गुन्हेगारांच्या दोन नंबर व्यवसायातुन मिळणारे अमर्यादित काळे धन यसर्वांच प्रभाव पोलीस यंत्रनेवार पडला आहे.

या खून प्रकरणातील अरोपीना अटक करुण ८ ते१० दिवस उलटूनही मारेकऱ्यानी अद्याप पर्यंत गुन्हात वापरलेले हत्यारे मोटर सायकाली पोलिसानी हस्तगत केली देखील नाही, याचाच अर्थ असा की पोलीस प्रशासनाला या प्रकारणाचे गांभीर्य नाही आहे असेच दिसते, या मुळे अरोपीना पोलीस प्रशासन मदत करीत आहे असाच होतो.

या संदर्भात धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुस हे आज महाराष्ट्र दिना निमित्त आज शहरात आले असता त्यांना निवेदन देण्यात आले.

यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ खरात पक्षाचे पदाधिकारी आणि उत्तर महाराष्ट्राचे अध्यक्ष किरणचंद्र ईशी, जिल्हाध्यक्ष विशाल पगारे धुळे शहर अध्यक्ष नागिंद मोरे विद्यार्थी आघाडीचे सुगत मोरे, अविनाश नागमल, लोटन बापू वाघ, बापू भामरे विवेक नेतकर आदि कार्यकर्ते उपस्थित होते.

 

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

eighteen − 4 =

Social media & sharing icons powered by UltimatelySocial